Latest

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा : ‘रात्रीस खेळ चाले’ फेम सरिता दिसणार ‘या’ भूमिकेत

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावर श्री देव वेतोबाची कथा मांडणारी 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' ही आणखी एक नवी मालिका चाहत्याच्या भेटीस येत आहे. १७ जुलैपासून येणाऱ्या या मालिकेत अभिनेता उमाकांत पाटील आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम प्राजक्ता वाडये दिसणार आहे.

श्री. देव वेतोबाची गोष्ट अनुभवयाला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर नव्या मालिकेत कलाकारांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळण्याचा आनंदही त्यांना होत आहे. अभिनेता उमाकांत पाटील हा या मालिकेचा प्रमुख चेहरा आहे जो 'वेतोबा'ची भूमिका साकारणार आहे. दरम्यान मालिकेत एका नव्या आणि प्रमुख पात्राची भूमिका पहायला मिळणार आहेत.

मालवणी भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणारी, कोकणचा चेडू आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत प्राजक्ता 'बायो' या पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे. प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिका इतक्या लोकप्रिय झाल्या की, प्राजक्ता हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलं. मालिकेतील प्राजक्ताचं 'बायो' हे मालवणी पात्रं लोकप्रिय ठरेल अशी भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे प्राजक्ताच्या या भूमिकेमुळे मालिकेचे प्रत्येक भाग रंजक वळणावर पोहोचणार आहेत.

'सोमिल क्रिएशन' प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित 'क्षेत्रपाल देव वेतोबा' मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी केले आहे. निलेश मयेकर यांनी कथा लिहिली आहे. तर राजेंद्रकुमार घाग यांनी पटकथा आणि महाबळेश्वर नार्वेकर यांनी संवाद लिहिले आहेत. येत्या १७ जुलैपासून 'क्षेत्रपाल श्री. देव वेतोबा' मालिका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT