Latest

Fatima Sana Shaikh : परी नव्हे ही सुंदरा! पहा ‘दंगल गर्ल’चा जलवा❤️

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

'दंगल गर्ल' फातिमा सना शेख हिने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. यात ती खूप हाॅट आणि बोल्ड दिसत आहे. सिल्व्हर गाऊनमध्ये फातिमा खूप ग्लॅमरस दिसत आहे. नो मेकअप लूक आणि ओपन हेअरमध्ये तिने आपला लूक कम्प्लिट केला आहे. ती जमिनीवरून डॉलर उचलताना दिसत आहे. पण, तुम्ही अगदी बारकाईने पाहिलं तर डॉलरच्या डिझाईनमध्ये ही सनाची हँडबॅग आहे.

fatima sana shaikh

फातिमा सना शेखने असा फोटोशूट केला आहे की, ज्यामध्ये तिला ओळखणे कठीण झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिने नुकतेच एक अतिशय ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फातिमाने हे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

fatima sana shaikh

फतिमाच्या सौंदर्याच्या खूप चर्चा आहेत. तिचे स्पॉटेड फोटो आणि व्हिडिओ दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत. फातिमा ३० वर्षांची आहे. ती चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकसाठी अधिक प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या फोटोजमध्ये तिची टोण्ड बॉडी दिसतेय.

fatima sana shaikh

फातिमा 'दंगल' चित्रपटासाठी ओळखली जाते. दंगल या चित्रपटापासून चाहते तिला दंगल गर्ल म्हणून ओळखतात. या फोटोंमध्ये फातिमा खूपच हॉट दिसत असून तिचे हे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सुपरस्टार आमिर खानसोबतच्या नात्यामुळे फातिमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. फातिमा सना शेखने दंगल चित्रपटात आमिर खानसोबत काम केले आहे. या चित्रपटात ती त्याच्या मुलीच्य़ा भूमिकेत होती. येत्या काही दिवसांत सॅम बहादूर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका ती साकारताना दिसणार आहे.

fatima sana shaikh

बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात

वयाच्या सहाव्या वर्षी तिने अभिनयाला सुरुवात केली आहे. अनेकांना वाटते की 'दंगल' हा फातिमाचा डेब्यू चित्रपट होता. पण, खूप कमी लोकांना कदाचित माहिती असेल की, तिने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने अगदी लहान वयात अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, फातिमाने चाची ४२० या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. नंतर 'वन टू का फोर' चित्रपटातही काम केले. मात्र, या चित्रपटानंतर ती १५ वर्षे मोठ्या पडद्यावर दिसला नाही. २०१२ मध्ये ती 'बिट्टू बॉस', 'टेबल नंबर २१' इत्यादी चित्रपटांतून पुनरागमन करायचे होते. पण यश मिळाले नाही.

fatima sana shaikh

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT