Latest

Makar Sankranti २०२३ : सुख कळले..!? म्हणत अक्षयाची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत: ‘या’ स्टार्सची संक्रांत उत्साहात

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तिळगुळ घ्या गोड-गोड बोला' असे म्हणत आज उत्साहात मकर संक्रांत (Makar Sankranti २०२३ ) पार पडत आहे. या दिवशी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण गोड तिळगूळ आणि तिळाचे लाडू देऊन एकमेकांना शुभेच्छा देत असतात. याच दरम्यान बॉलिवूड आणि मराठी कलाकार मागे कसे राहतील. मराठीतील काही खास कलाकारांनी मकर संक्रात सोशल मीडियावर फोटो शेअर करून केली आहे. तर पाठकबाई म्हणजे, मराठी अभिनेत्री अक्षया देवघरची पहिली मकर संक्रांत जोरदार साजरी झाली आहे.

अक्षया देवधर

मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या साडीतील व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात तिने ब्लॅक- सोनेरी रंगाच्या साडीसोबत नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, केसांत गजरा, केसांचा अंबाडा, कानात फुले, गळ्यात मोत्याचा हार- मंगळसूत्र, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. अक्षयाने किलर पोझ दिली असून यावेळी ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सुख कळले..!?'. असे लिहिले आहे. अक्षयाचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात नेटकऱ्यांनी तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रातीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेमांगी कवी

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या इंन्स्टाग्रामवर मकर संक्राती निमित्त मराठमोळ्या लूक शेअर केला आहे. यात तिने खास करून ब्लॅक रंगाच्या साडीसोबत रेड- सोनेरी बॉऊज, नाकात नथ, कानात झुमके, कपाळावर टिकली आणि मेकअपने चारचॉंद लावले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'तिळगुळ घ्या गोडगोड बोला!' असे लिहिले आहे. यानंतर चाहत्यांनी तिला भरभरून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा सावंत

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने ब्लॅक रंगाचे स्वेटर आणि ब्लॅक रंगाची जिन्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो तिने बाल्कनीत क्लिक केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'January baby ✨?, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ?' असे लिहिले आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी तिला भरभरून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मायरा वायकुळ

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी म्हणजे, बालकलाकार मायरा वायकुळनेही मकर संक्रांत दणक्यात साजरी केली आहे. यात तिने ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील व्हिडिओ आणि ब्लॅक रंगाच्या नऊवारी साडीतील फोटो खूपच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'कणभर तिळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. ?'. असे आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ?' असे लिहिले आहे. नऊवारी साडीतील तिने फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत. यात तिच्या वेगवेगळ्या पोझने चाहत्यांना घायाळ केलं आहे. ( Makar Sankranti २०२३ )

याच दरम्यान मराठी अभिनेत्री माधवी निमकर , रिंकू राजगुरू, अश्विनी महागंडे, मिथिला पालकर, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे यांनी चाहत्यांसोबत मकर संक्रांत साजरी केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT