Latest

Ravindra Mahajani Passed Away : ‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘देवता’! चित्रपटसृष्टीला चटका लावणारी एक्झिट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड झाले. रवींद्र महाजनी मराठी चित्रपटातील देखणे आणि दमदार अभिनेते, दिग्दर्शक होते. (Ravindra Mahajani Passed Away) सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्ध ते ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, महाजनी यांनी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला. (Ravindra Mahajani Passed Away) १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला होता.

करिअर

मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या सुरुवातीच्या करिअरमध्ये त्यांनी टॅक्सी चालवली आणि चित्रपटांचे ऑडिशन दिले. त्यांनी १९८७-१९८८ पर्यंत मराठी चित्रपट बनवले. असं म्हटलं जातं की, दिग्दर्शक एन. चंद्रा यांची इच्छा होती की, रवींद्र महाजनी यांनी १९८६ अंकुश चित्रपटामध्ये अभिनय करावा. पण, महाजनी यांनी नकार दिला.

महाजनी यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांमध्ये हा सागरी किनारा, खेळ कुणाला दैवाचा कळला, सुंबरान, फिटे अंधाराचे जाळे अशा गाण्यांचा समावेश आहे. देवता, सर्जा, दुनिया करी सलाम, मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत, हळदी कुंकू अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. लक्ष्मीची पावले एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. २०१५ मध्ये काय राव तुम्ही या चित्रपटातून त्यांनी वापसी केली.

प्रसिद्ध चित्रपट- 

देवता
मुंबईचा फौजदार
देवघर
गोंधळातला गोंधळ
आराम हराम आहे
थोरली जाऊ
हळदी कुंकू
देऊळबंद
काय राव तुम्ही
कॅरी ऑन मराठा
गूंज

पानीपत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT