Latest

प्रेम व्यक्त करणं आता आणखी सोप्पं!; रोमँटिक ‘सपान’ गाणं भेटीला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना…' या वाक्यासाठी अतिशय योग्य उदाहरण म्हणून एक नवं कोर गाणं प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. ब्रह्मचारी म्हणून आयुष्यभर राहणार असा प्रण घेतलेला तरुण त्याच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी येताच घेतलेले प्रण कसे विसरतो आणि त्या मुलीच्या प्रेमात बेधुंद होऊन कसे रमतो याचे हुबेहूब वर्णन करणारे 'सपान' हे रोमँटिक गाणे चाहत्यांच्या भेटीस आले आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित आणि 'स्वप्न स्वरूप' निर्मित या गाण्यात अभिनेता जिगर मुकेश शाह आणि अभिनेत्री दिव्या गुप्ता ही जोडी पाहायला मिळतेय.

पेशाने सीए असणारा जिगर अभिनयापोटी आणि मराठी गाण्यांच्या प्रेमापोटी थेट कॅनडाहून भारतात आला. सीए होण्यासोबत त्याने अभिनेता होण्याचे इतकी वर्ष उराशी बाळगून ठेवलेले स्वप्नही तो पूर्ण करण्यात यशस्वी झाला आहे. या गाण्यात जिगर आणि दिव्याचा रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे. या गावरान प्रेमगीताला आपल्या सर्वांचा लाडका गायक म्हणजेच केवल वालंज याने त्याचा सुमधुर स्वर दिला आहे.

तर मराठी गाणी आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात यांनी या गाण्याच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. 'सपान' या गाण्याला छायाचित्रकार सागर आंबात यानी केलं आहे. एका रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद 'सपान' या गाण्यातून युट्युबवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT