Salman Khan : सलमानचे महागडे घड्याळ | पुढारी

Salman Khan : सलमानचे महागडे घड्याळ

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटांप्रमाणेच दरवर्षी ‘बिग बॉस’ या शोचीही उत्सुकता असते. ‘बिग बॉस’चा सोळावा सिझन नुकताच संपला आहे; मात्र, त्याच्याशी निगडीत चर्चा अद्याप संपल्या नाहीत. यादरम्यान सलमानच्या हातातील महागडे घड्याळ चर्चेत आहे. या घड्याळाची किंमत २८ लाख ९० हजार इतकी आहे.

‘बिग बॉस १६’ संपल्यानंतर सलमानने ( Salman Khan ) सर्व स्पर्धकांसोबत फोटो क्लिक केला होता. यात त्याच्या मनगटावर एक घड्याळ पाहायला मिळाले. त्याची किंमत समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सलमानच्या या घड्याळाचीच चर्चा होत आहे. इंडियन वॉच कॉनेसर नावाच्या इन्स्टाग्राम पेजने सलमानच्या घडाळ्याचा फोटो पोस्ट केला आहे. यात एका बाजूला सलमानने त्याच्या हातात घड्याळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे केवळ घड्याळाचा स्पष्ट फोटो पोस्ट केला आहे.

Salman Khan च्या मनगटावरील गोल्डन वॉच चर्चेत; घड्याळ्याच्या किंमतीत सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करू शकेल घर!

Back to top button