Latest

Deepika Padukone : ‘पठान’मध्ये बंदुकसोबत दीपिकाचा ग्लॅमरस तडका; ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि जॉन अब्राहम यांचा आगामी 'पठान' गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील भगव्या बिकिनीवर अनेकांनी आक्षेप घेतला. यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीनला कात्री लावली. याच दरम्यान चित्रपटातील कलाकारांचे नवे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहेत. या पोस्टरसोबत चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटची घोषणा केली आहे.

अभिनेता दीपिका पादुकोणने ( Deepika Padukone ) तिच्या इंन्स्टाग्रामवर आगामी पठान चित्रपटातील चार पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. यात पहिल्या पोस्टमध्ये दिपिका, दुसऱ्यामध्ये शाहरूख, तिसऱ्यामध्ये जॉन अब्राहम आणि चौथ्यामध्ये तिघेही हॅशिग लूकमध्ये दिसते. या पोस्टरमध्ये दिपिकाच्या हातात बंदुक, शाहरूखच्या हातात रायफल आणि जॉन गण दिसतेय. यात खास करून दिपिकाने आकाशी कलरच्या आऊटफिटमध्ये एकदम ग्लॅमरस दिसतेय. या पोस्टरसोबत चित्रपटाची ट्रेलरची घोषमा करण्यात आली आहे.

या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये '???? ती पण एका मिशनवर आहे! उद्या सकाळी ११ वाजता #PathaanTrailer येत असताना अधिक जाणून घ्या!, २५ जानेवारीला फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर #YRF50 सह #Pathaan साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. ' असे कॅप्शन लिहिले आहे. यावरून पठानचा ट्रेलर उद्या म्हणजे, १० जानेवारीला येत असल्याचे सांगितले जात आहे. तर चार पोस्टरला वेगवेगळ्या कॅप्शन देत ट्रेलरची रिलीज डेटची माहिती दिली आहे. यासोबत शाहरूखचे एक स्लो मोशन पोस्टरदोखील रिलीज करण्यात आले आहे.

पठान हा चित्रपट २५ जानेवारीला चाहत्याच्या भेटीस येत आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT