Latest

Akshay Kumar: अक्षयने ‘रक्षाबंधन’ची दाखविली झलक; ‘या’ दिवशी होणार रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा खिलाडी आणि अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दुसरा आगामी चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटाचे नाव 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) असून त्याच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. तर अक्षयने 'रक्षा बंधन'चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखविली आहे.

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. हा चित्रपटातील काही सीन चाहत्याच्या पंसतीस उतरले नसल्याने तो दणकून आदळला. परंतु, अक्षय कुमार यामुळे निराश न होताच त्याने आपल्या नविन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये स्वत: ला बिझी ठेवले. अक्षयचा आगामी 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याच दरम्यान अक्षयने त्याच्या इंन्स्टाग्रामवर 'रक्षा बंधन' चित्रपटाची एक झलक दाखविली आहे. यात ठळक अक्षरात चित्रपटाने नाव आणि त्यावर रंगीबेरंगी वेगवेगळे रंग दाखविले आहेत. यासोबत अक्षयने आगामी 'रक्षा बंधन' चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपट गृहात दाखल होणार आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिले आहे की, "मी तुमच्यासाठी पवित्र बंधनाची अशी एक कथा घेऊन येत आहे. जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्वाच्या दिवसाची आठवण करून देईल."

रक्षाबंधन या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा रक्षाबंधन या हिंदू परंपरेतील भाऊ-बहिणी याच्या नात्यातील सणावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची झलक आतापर्यंत ९ लाखांहून अधिक जणांनी पाहिली आहे. यापुर्वी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची जोडी 'टॉयलेट: एक प्रेम कथा' मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT