पुणे : लांडेवाडीत जागेच्या वादातून महिलेस मारहाण | पुढारी

पुणे : लांडेवाडीत जागेच्या वादातून महिलेस मारहाण

मंचर : पुढारी वृत्तसेवा : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जागेच्या वादातून ज्येष्ठ महिला व तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद जिजाबाई तुकाराम लांडे (रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जिजाबाई लांडे आणि त्यांचे चुलत पुतणे बाबाजी नामदेव लांडे यांच्यात जागेच्या कारणावरून वाद आहे. जिजाबाई लांडे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम चालू असताना तेथे बाबाजी नामदेव लांडे, सुनील नामदेव लांडे, राजेंद्र नामदेव लांडे, अजय बाबाजी लांडे, विजय बाबाजी लांडे, नामदेव कुशाबा लांडे, संतोष महादू लांडे, सविता सुनील लांडे, सुरेखा राजेंद्र लांडे (सर्व रा. लांडेवाडी) हे तेथे आले. त्यांनी जिजाबाई लांडे यांनी खोदलेल्या पायात माती टाकली तसेच ‘येथे घर बांधायचे नाही, ही जागा आमची आहे,’ असे म्हणत शिवीगाळ करू लागले. बाबाजी नामदेव लांडे याने फिर्यादीस लाथ मारत ढकलून दिले.

दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार

जिजाबाईंच्या ओरडल्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुली छाया विनोद काळे, इंदूबाई बाळशीराम तोत्रे, अनिता भास्कर आवटे व कविता रामदास काळे ह्या तिथे आल्या. त्या जिजाबाईंना घरी घेऊन आल्या असता आरोपींनी मुलींना शिवीगाळ करीत दांडके, दगड, गजाने मारहाण केली. जिजाबाई लांडे यांचे जावई बाळशीराम नाथा तोत्रे (रा. कुरवंडी, ता. आंबेगाव) हे भांडण सोडविण्यासाठी आले
असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तसेच जनावरांचा गोठा पाडून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भांडणात छाया विनोद काळे यांचे मंगळसूत्र गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button