Latest

Thank God Trailer : अजय- सिद्धार्थच्या ‘थँक गॉड’चा मजेशीर ट्रेलर पाहाच

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा आगामी 'थँक गॉड' हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा  ट्रेलर रिलीज ( Thank God Trailer ) करण्यात आला आहे. अपघातानंतर एका पापी व्यक्तीची स्वर्गात चित्रगुप्ताशी भेट होत असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

अभिनेता अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'थँक गॉड' चित्रपटाचा ट्रेलर ( Thank God Trailer ) रिलीज केला आहे. ट्रेलरच्या सुरूवातील अजय देवगणने चित्रगुप्त पारंपारिक वेशभूषेत सिद्धार्थ मल्होत्रासमोर येतात. त्याला संस्कृतमध्ये स्वत: चित्रगुप्त असून तू स्वर्गात असल्याचे सांगतात. परंतु, हे संस्कृतमध्ये बोलत असल्याने त्याला काहीही समजत नाही. यानंतर मात्र, चित्रगुप्त आधुनिक म्हणजे, मॉडर्न वेशभूषेत दिसतात. यावेळी ते पारंपारिक शर्ट, धोतर आणि सोन्याचा मुकुट सोडून ब्लॅक रंगाच्या सूटमध्ये एकदम हटके दिसतात.

एकीकडे सिद्धार्थचा अपघात झालेला असतो.  तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे त्याच्यासोबत चित्रगुप्त पाप आणि पुण्याचा खेळ खेळत असतात. याच दरम्यान त्याला त्याच्या वाईट कृत्ये सुधारण्याची शेवटची संधी दिली जातेय. यावेळी सिद्धार्थ म्हणतो की, वरती स्वर्गातही गेम सुरू असतो हे आश्चर्यकारक आहे.

यावर चित्रगुप्त (अजय ) प्रत्युत्तर देतो की, पहिल्यादा वरूनच सुरुवात होते आणि जमिनीवर तो सुपरस्टार ठरतो. तो खूप दिवसांनी येथे आला, गेम जिंकला आणि निघून गेला. खाली जा आणि तुझा गेम सुरू कर. याच दरम्यान उभा असलेला चित्रगुप्त म्हणतो- KMC साहेब. मग सिद्धार्थ त्याला योग्य नाव सुचवत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविले आहे. चित्रपटातील चित्रगुप्त आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्री यामुळे चाहत्याच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

थँक गॉड चित्रपटाचा पहिला टिझर समोर आल्यावर वादात सापडला होता. यातील चित्रगुप्ताच्या भूमिकेवर सोशल मीडिया यूजर्स आणि राजकारण्यांनी आक्षेप घेतला होता. राजस्थानमधील कायस्थ समाजाच्या लोकांनी आणि राजकारणांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये हिमांशू श्रीवास्तव नावाच्या वकिलाने सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण आणि दिग्दर्शक इंदर कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या चित्रपटात धर्माची खिल्ली उडवून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT