Latest

जळगाव : भरधाव ट्रक घरात शिरला, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

सोनाली जाधव

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ  शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने धावणारा ट्रक घरात शिरल्याने एकाचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. (Accident)

भुसावळ शहरातील यावल रोडवरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या रस्त्यावर अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. दरम्यान, आज भरधाव वेगाने धावणार्‍या एमएच ४६ एएफ ५५५४ क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. (Accident)  यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्‍या झोपडीवजा घरात वेगाने गेला. या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून; एक जण जखमी झाला आहे. तर, रस्त्यावर कट  मारत असताना दोन जण जखमी झाले आहेत. शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

 Accident रोडवरील असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा अधोरेखीत

या दुर्घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून; तपास सुरू केला आहे. दरम्यान, ट्रकचा चालक हा मद्यधुंद होता की काय? याबाबत चौकशी करण्यात येत आहे. तर रस्त्याला लागून असणार्‍या झोपडीवजा घरावर हा ट्रक आदळल्याने घराचे मोठे नुकसान देखील झाले आहे. यावल रोडवरील असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT