Latest

कोल्हापूर : आलिशान कारची ट्रायल घेण्याचा मोह पडला महागात

Shambhuraj Pachindre

सादळे-मादळे घाटात मंगळवारी रात्री 11 वाजता कारचा ब्रेक  निकामी होऊन कार दगडावर आदळल्याने जळून खाक झाली. चालकाने कारमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.

गोवा येथील सलीम अहमद यांची बीएमडब्ल्यू (एमएच 12 बीएक्स 4545) कारचे इंजिन नादुरुस्त झाल्याने त्यांनी शिरोली माळवाडी भागातील समीर मिस्त्री यांच्याकडे ती दुरुस्तीला सोडली होती. सलीम यांनी कारची दुरुस्ती करून ट्रायलसाठी सादळे-मादळे येथे गेला होता. शिरोलीकडे येत असताना घाटात उतार्‍यावर ब्रेक  निकामी झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने कारमधून उडी मारली. कार तशीच पुढे जाऊन दगडावर आदळल्याने पेट घेऊन जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मोह पडला महागात!

लाखो रुपये किमतीच्या आलिशान कारची ट्रायल घेणे मिस्त्रीच्या जीवावर बेतले असते. शिरोली ते सादळे-मादळे घाटाचे आठ किलोमीटरचे अंतर असून कारची ट्रायल घेण्यासाठी त्याने घाट गाठला. ब्रेक फेल झाल्याने त्याने आपला जीव वाचविण्यासाठी गाडीतून बाहेर उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला. पण आलिशान कारची ट्रायल घेण्याचा मोह त्याला महागात पडला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT