Latest

Ghoomer Trailer : ‘घूमर’चा दमदार ट्रेलर रिलीज, अभिषेक बच्चनसाठी गेम चेंजर ठरणार चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिषेक बच्चन-सैयामी खेर स्टारर चित्रपट 'घूमर'चा ट्रेलर रिलीज झाला. (Ghoomer Trailer) हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. यामध्ये एका बुद्धिवान खेळाडूचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. चित्रपटामध्ये अभिषेक एक क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. तर सैयामी इंडियन क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. (Ghoomer Trailer)

काय आहे 'घूमर'चा ट्रेलर?

'घूमर'च्या ट्रेलरमध्ये सैयामी इंडियन प्लेयर अनिकाची भूमिका आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष करताना दिसली. अनिका आपल्या देशासाठी खेळू इच्छिते. तिचे इंडियन क्रिकेट टीममध्ये निवडदेखील होते. ती देशाचे नाव उज्ज्वल करते. त्याआधी तिच्या आयुष्यात वादळ येतं आणि सर्व काही बदलतं. अपघातात एक हात गमावल्यानंतर तिच्या आयुष्यावरून विश्वास उठतो. क्षणभरात सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली. ती आयुष्य जगण्याची आशा सोडून देते.

अनिका स्वत:ला संपवणार असते. त्यावेळी तिच्या आयुष्यात प्रशिक्षक (अभिषेक बच्चन) ची एंट्री होते. तो अनिकाला एका हाताने खेळण्याचे प्रशिक्षण देतो. अनिका पुन्हा नव्याने लाईफ सुरू करण्याची प्रेरणा घेऊन एका हाताने क्रिकेट खेळणे सुरू करते.
अभिषेकसाठी गेम चेंजर चित्रपट

सुरूवातीपासून शेवटपर्यंत २ मिनिटे २७ सेकेंदच्या ट्रेलरमध्ये तुम्ही जागेवरून हलणार नाही, असा हा ट्रेलर आहे. यामध्ये अभिषेक-सैयामीचा दमदार अभिनय आहे. हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी रिलीज आहे. अंगद बेदी, शबाना आजमी आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

SCROLL FOR NEXT