Latest

3 Idiots Sequel : करीनाला भनकही लागू दिली नाही; आमिरची सिक्वेलची जोरदार तयारी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकुमार हिरानी दिग्दर्शित '३ इडियट्स' ( 3 Idiots Sequel ) हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट २००९ साली रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी, बोमन इराणी आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनी दर्जेदार अभिनय साकारला. यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या सिक्वेलची उत्कंठा लागली होती. दरम्यान करिनाने एक व्हिडिओ शेअर करत '३ इडियट्स' सिक्वेल येत असल्याचे सांगत स्वत: ला याबदद्ल भनकही लागू न देता आमिर जोरदार तयारी करत असल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री करीना कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आगामी '३ इडियट्स' ( 3 Idiots Sequel ) चा सिक्वेलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यात तिने आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवन याच्या एका मुलाखतीचा फोटो दाखविला असून यावर '३ इडियट्स' असे शब्द लिहिले आहेत. हे पाहून करिना आश्चर्याचकित होवून स्वत: ला न सांगताच गुपचूप तिघेजण काय करत आहेत? असे म्हणतेय.

यात तिने म्हटलं आहे की, 'मी सुट्टीवर गेले होते. त्यामुळे याबद्दल मला काहीही माहिती नव्हती. या पत्रकार परिषदेची माहिती मला आत्ताच समजली. मला न सांगताच काहीतरी चालू आहे. शर्मन जोशीच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे असे समजू नका. मात्र, मला वाटते की, '३ इडियट्स' चा सिक्वेलची तयारी सुरू आहे. असे असेल तर मग माझ्याशिवाय हे कसे शक्य आहे. मला याबद्दल जाणून घ्यायचे आहे. लगेच बोमन इराणी फोन लावते आणि काय गुपचूप चाललेय ते विचारते.' असेही ती म्हणतेय.

या व्हिडिओत करिना स्वत: चा फोन उचलून कानाला लावताना दिसतेय. मात्र, तिचे नक्की त्याच्याशी बोलणे होते की नाही? याबाबतची शंका आहे. यामुळे नक्की '३ इडियट्स' चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू आहे की नाही? याबाबत कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी राजकुमार हिरानी यांनी '३ इडियट्स' चा सिक्वेल येणार असल्याची माहिती दिली होती. यात त्यांनी चित्रपटातचे स्क्रिप्टिंग सुरू असून त्यांचे सहलेखक अभिजात जोशी करत असल्याचे म्हटलं होतं. २००९ साली '३ इडियट्स' चित्रपटात आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवन याच्यासोबत करिना दिसली होती. मात्र, सिक्वलची काहीच कल्पना करिनाला मिळालेली नाही. यामुळे ती थोडी चकीत झाली आहे. ही माहिती सोशल मीडियावर मिळताच चाहत्यांनी सिक्वलमध्ये करिना आहे की नाही? याबद्दल अनेक तर्क- वितर्क लढविले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT