Latest

Aadhaar-PAN Link : ‘आधार-पॅन लिंकिंग’साठी ३१ मार्च डेडलाईन; …असे करा लिंक

मोहन कारंडे

नवी दिल्ली : आधार कार्ड – पॅन कार्ड लिंकिंगसाठी (Aadhaar-PAN Link) ३१ मार्च २०२३ ची डेडलाईन असून, ते लिंक न केल्यास पॅन कार्ड अवैध ठरणार आहे. प्राप्तिकर विभागाने तसा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर भरणा करण्यासाठी आधार कार्ड – पॅन लिंकिंग सक्ती आधीच जाहीर केली होती. त्याला वारंवार मुदतवाढ दिली आहे. आता ३१ मार्च ही शेवटची डेडलाईन असणार आहे. पॅन कार्ड रद्द झाल्यास प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आधार – पॅन लिंकिंग मुदतीआधी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Aadhaar-PAN Link)

असे करा आधार-पॅन लिंक (Aadhaar-PAN Link)

  • प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा.
  • त्या वेबसाईटवर आधार लिंकवर क्लिक करा.
  • वेबसाईटवर पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव (आधारवरील नोंदीनुसार) नोंद करावे.
  • आधारवर पूर्ण जन्मतारखेऐवजी केवळ जन्माचे वर्ष असेल, तर संबंधित तपशीलावर खूण करावी.
  • नोंद केलेला तपशील तपासा आणि आधार लिंकसाठीच्या बॉक्सवर खूण करा.
  • सबमिट करण्याच्या आधी दिलेल्या तपशिलाची खात्री करा.
  • शेवटी, सबमिट बटणवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला लिंक झाल्याचा मेसेज मिळेल.(पॅन कार्ड- आधार लिकिंगसाठी 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये होते. आता एक हजार रुपये झाले आहे.)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT