black hole : सूर्य ब्लॅक होल होऊन पृथ्वीलाच गिळेल? | पुढारी

black hole : सूर्य ब्लॅक होल होऊन पृथ्वीलाच गिळेल?

न्यूयॉर्क : अंतराळात घडणार्‍या अनेकविध घटनांचे कोडे मानवाला अजूनही उकललेले नाही. कारण, या ब्रह्मांडाची (black hole) कक्षाच एवढी विस्तीर्ण आहे की, त्याबद्दल कसलाच अंदाज बांधता येत नाही. तरीदेखील या घडामोडींचा वेध घेण्याचे मानवी प्रयत्न थांबलेले नाहीत. अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धादरम्यान अमेरिकेने रशियाच्या अणुप्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी ‘वेला’ नावाचा हेरगिरी करणारा उपग्रह लाँच केला. रशियाने अणुचाचणी केली तर वेला त्यातून उत्सर्जित होणारी गॅमा किरणं ओळखू शकत होता. संशय होता तशी अमेरिकेला गॅमा किरणेदेखील आढळली. तथापि, ही गॅमा किरणे रशियाकडून आलेली नव्हती.

अंतराळात सौरमालेच्या पलीकडे झालेल्या गॅमा रे बर्स्टमधून उत्सर्जित होणारी ती किरणे होती. (black hole) अनेक वर्षांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले की, सुपरनोव्हा आणि ब्लॅकहोल्सच्या (कृष्णविवर) निर्मितीमुळे गॅमा किरणांचे हे स्फोट घडत असतात. वैज्ञानिक शोध दोन मार्गांनी लागतात. एक म्हणजे नैसर्गिक घटनांचे निरीक्षण करून आणि त्याद्वारे एक सिद्धांत तयार करणे. दुसरा मार्ग म्हणजे पूर्णपणे सैद्धांतिक कल्पनांच्या आधारे नैसर्गिक घटनांचा अंदाज बांधणे आणि त्यानंतर प्रयोग करून अशा घटनांची पुष्टी करणे.

अंदाजे 100 वर्षांपूर्वी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे अंतिम समीकरण मांडले. त्यांच्या समीकरणांनी विश्वातील आश्चर्यकारक घटनांच्या संदर्भात अंदाज बांधले गेले. तार्‍यांमध्ये जोपर्यंत इंधन असतं तोपर्यंत ते न्युक्लिअर फ्यूजन प्रक्रियेद्वारे उष्णता आणि प्रकाश देत असतात. जेव्हा त्यामधील इंधन कमी होते, तेव्हा ते आकुंचन पावतात आणि त्यांची घनता वाढून ब्लॅक होल (black hole) तयार होते. या ब्लॅक होलच्या जवळ जे जाईल ते त्याच्या आत खेचले जाईल, प्रकाशासह सर्वकाही. ब्लॅक होलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे हे घडते. मग सूर्य हा देखील एक तारा आहे. त्याचेही एका ब्लॅक होलमध्ये रूपांतर होऊन तो पृथ्वीला गिळून टाकण्याची शक्यता आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

सुब्रह्मण्यम चंद्रशेखर या तामिळनाडूतील शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे हे सिद्ध केले होते की, ज्या तार्‍यांचे वस्तुमान सूर्याच्या 1.44 पट आहे (चंद्रशेखर लिमिट) फक्त तेच ब्लॅक होल (black hole) बनू शकतात. याच महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना 1983 साली भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

हेही वाचा :

Back to top button