Latest

सातारा- धक्कादायक! साखरवाडीत अल्पवयीन मुलीची प्रसुती, बलात्काराचा गुन्हा दाखल

स्वालिया न. शिकलगार

साखरवाडी (जि. सातारा) : पुढारी वृत्तसेवा – साखरवाडी तालुका फलटण येथे १ वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला होता. सदर मुलीची सातारा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली असून तिच्या पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

फलटण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, साखरवाडीतील एकाचा ४ एप्रिल, २०२२ रोजी अल्पवयीन मुलीशी प्रेम प्रकरणातून विवाह करण्यात आला होता. त्यातून सदर मुलगी गर्भवती राहून तिची 14 मार्च रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात प्रस्तुती झाली. डॉक्टरांनी तिच्याकडे वयाचा दाखला मागितला असता मुलीचे वय प्रसुतीवेळी १८ वर्षांचे असल्याचे व विवाहवेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पतीवर पोक्स अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील अधिक पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT