Latest

Breaking News : दिल्लीतील ग्रेटर कैलाशच्या वृद्धाश्रमात भीषण आग, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्लीतील ग्रेटर कैलाश पार्ट 2 च्या एका नर्सिंग होममध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आज पहाटे 5 वाजून 14 मिनिटांनी याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या 4 गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशामक दलाने सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या दरम्यान आगीत होरपळून दोन ज्येष्ठ नागरिक महिलांचा मृत्यू झाा. त्यामध्ये एकीचे वय 92 तर दुसरीचे वय 82 वर्ष सांगितले जात आहे. त्यांचे नाव अद्याप समजले नाही. याशिवाय एकजण गंभीर जखमी झाला आहे. तर पोलीस आणि अग्निशामक दलाने मिळून 13 लोकांना रेस्क्यू केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT