Latest

बंगळुरात धावणार विनाचालक मेट्रो

अनुराधा कोरवी

बंगळूर : विनाचालक मेट्रोद्वारे प्रवास करण्याचे बंगळूरवासीयांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या शहरात चेन्नईहून सहा डब्यांची आलिशान मेट्रो दाखल झाली असून ती यलो लाईनवर धावेल. या मेट्रोची निर्मिती चीनमध्ये करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

यातील प्रत्येक डब्याची लांबी 21 मीटर असून लवकरच या मेट्रोच्या तब्बल 40 चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर ही मेट्रो दक्षिण बंगळूरमध्ये धावू लागेल, असा विश्वास रेल्वे अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या यलो लाईनचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर एकूण 16 स्थानकांचा समावेश आहे. एकदा ही मेट्रो सुरू झाल्यानंतर बंगळूरमधील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यावर मेट्रो हा प्रभावी उपाय ठरणार असल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT