Latest

Japan Airlines Fire : ३०० हून अधिक प्रवाशी असलेल्या जपान एअरलाइन्सच्या विमानाला हानेडा विमानतळावर भीषण आग

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  जपान एअरलाइन्सच्या विमानाला टोकियोच्या हानेडा विमानतळावर आज (दि.२) आग लागल्याची घटना घडली आहे. आगी विझविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त जपानच्या NHK न्यूजने दिले आहे. Japan Airlines Fire

जपान एअरलाइन्सचे विमान कोस्ट गार्डच्या विमानाला धडकल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे वृत्त आहे. जपान सरकारची अधिकृत मीडिया NHK ने अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, हानेडा येथे लँडिंग केल्यानंतर विमानाची दुसऱ्या विमानाशी टक्कर झाली असावी. जपान एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की हे विमान होक्काइडो येथील शिन-चिटोसे विमानतळावरून निघाले होते आणि त्यात ३७९ प्रवासी होते. सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT