हैदराबाद : हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीसाठी आपल्याकडून सर्रास जास्त पैसे आकारले जातात आणि त्यासाठी काही कारणे देखील असतात, पण काही हॉटेल्स पाण्याच्या बाटलीसाठी अगदी अव्वाच्या सव्वा पैसे आकारतात. हैदराबादमध्येही असाच एक किस्सा घडला; मात्र ग्राहकाने याबाबत रीतसर दाद मागितली. अगदी न्यायालयापर्यंत धाव घेतली आणि 10 रुपयांच्या बाटलीसाठी जास्त आकारणी केल्याबद्दल सदर हॉटेल चालकाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
हैदराबादमधील एका हॉटेलमधील हा किस्सा आहे. एक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. आश्चर्य म्हणजे, या हॉटेलमध्ये पाणी विकत घ्यावे लागत होते. त्यामुळे, नाईलाजानेच त्या व्यक्तीने पाणीही मागवले; मात्र तेथे पाण्यासाठीही जादा पैसे आकारले जात होते, ती बाब या ग्राहकाच्या पचनी पडली नाही. त्याने जिल्हा ग्राहक विवाद निवारण केंद्राकडे धाव घेतली आणि यातील निकालही ग्राहकाच्या बाजूने लागला.
झाले असे की, या ग्राहकाने 50 रुपयांची पाण्याची बाटली खरेदी केली होती. त्याला प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी देण्यात आले, पण ग्राहकाने ते पाणी पिण्यास नकार दिला. कारण त्याला प्लास्टिकची एलर्जी होती. त्यामुळे त्याने रेग्युलर वॉटर मागितले, पण वेटरने या हॉटेलमध्ये रेग्युलर वॉटर मिळत नसल्याचे सांगितले. शेवटी, अर्धा लीटरसाठी 50 रुपये खर्च करत ग्राहकाने पाणी विकत घेतले, पण घरी गेल्यावर मात्र त्याने या हॉटेलच्या मालकाला चांगलाच धडा शिकवला. त्याने दोन पदार्थ आणि एक पाण्याची बाटली खरेदी केली. त्यासाठी त्याच्याकडून 630 रुपये घेतले. या बिलामध्ये 31.50 रुपये सर्व्हिस चार्ज लावला होता. याशिवाय, पाण्याच्या बाटलीवर 5 टक्के सीजीएसटी
आणि एसजीएसटी टॅक्स लावला. त्यामुळे फायनल बिल 695 रुपये झाले.
परिणामी संतापलेल्या ग्राहकाने 'जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली. अन् या प्रकरणात तो जिंकला. परिणामी कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून त्याला 5 हजार रुपये देण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर त्याने खटला दाखल करताना खर्च केलेले 1 हजार रुपये देखील त्याला देण्याचे आदेश दिले. त्यामुळे, हॉटेल चालकाला या 50 रुपयांच्या बाटलीसाठी 5 हजार रुपये मोजावे लागल्याचे स्पष्ट झाले.