Latest

रोहित आऊट झाल्यानंतरची मस्करी जीवावर बेतली; मारहाणीत गंभीर जखमी वृद्धाचा मृत्यू, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

मोहन कारंडे

शिगणापूर; पुढारी वृत्तसेवा : आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या चेन्नईच्या चाहत्याचा मुंबईच्या दोन चाहत्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे बुधवारी (दि.२७) रात्री टीव्हीवरील आयपीएल क्रिकेट सामना बघताना चेष्टा मस्करीतून झालेल्या भांडणातून मारहाणीची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या बंडोपंत बापू तिबिले (वय ६७) यांचा शनिवारी (दि.३०) रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. (IPL 2024)

हणमंतवाडीत शिवाजी गायकवाड यांच्या घरी बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान आयपीएल क्रिकेटचा सामना गल्लीतील लोक बघत असताना बंडू तीबिले व बळी महादेव झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली. त्याचे रूपांतर बाहेर आल्यानंतर भांडणात झाले. बळी झांजगे व त्यांचा पुतण्या सागर सदाशिव झांजगे यांनी केलेल्या मारहाणीत बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गेले तीन दिवस उपचार सुरू होते. त्यांच्या कान व नाकान रक्तप्रवाह थांबत नव्हता. आज त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. (IPL 2024)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT