पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा खासदार आणि अमरावती येथील भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरुद्ध तेलंगणामधील शादनगर (हैद्राबाद) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्यावरील टीकेनंतर नवणीत राणा यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
वृत्तात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवणीत राणा यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम १८८ अन्वये त्यांच्यावर हैद्राबादमधील शादनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला FST फ्लाइंग स्क्वॉड, निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार आली आहे. निवडणूक ड्युटीवर असलेले निवडणूक आयोगाचे FST कृष्ण मोहन यांनी काल ही तक्रार दाखल केली आहे. (Navneet Rana)
सोमवार १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात तेलंगणातील मतदारसंघांचा देखील समावेश आहे. या पाश्वभूमीवर महाराष्ट्राच्या खासदार नवनीत राणा सध्या तेलंगणा दौऱ्यावर होत्या. श्रीमती माधवीलता यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी ओवैसीला खुलेआम ठणकावले तुम्ही 15 सेंकेद पोलीस हटवा तुम्ही कोठे होता कुठे गायब झाले तुम्हाला कळणार नाही तसेच 'काँग्रेस'ला व 'एआयएमएम'ला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत दिल्या सारखे आहे, असे म्हटले आहे. हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला मतदान करावे लागेल. नवणीत राणा यांच्या 'या' टिप्पणीवर तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर आयपीसी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: