Latest

मुंबई : पतीनेच पत्‍नीवर केला ॲसिड हल्‍ला

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी ऑनलाईन एका ६९ वर्षीय व्यक्‍तीने आपल्‍या ५६ वर्षीय पत्‍नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी घडली. पतीला पत्‍नीचे दुसऱ्या व्यक्‍तीशी प्रेमसंबंध असल्‍याचा संशय होता. या रागातून त्‍याने पत्‍नीच्या चेहर्‍यावर ॲसिडचा हल्‍ला केला. व्यंकटेश तनीर असे या संशयीत पतीचे नाव आहे.

वडाला टीटी पोलिसांनी संशयीत पतीला अटक केली असून, त्‍याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संशयीत पतीला आपल्‍या पत्‍नीवर इतर पुरूषाशी संबंध असल्‍याचा संशय होता. यातून या पती-पत्‍नीची नेहमी भांडणे व्हायची. दरम्‍यान ९ एप्रिल रोजी याच कारणावरून पती-पत्‍नीमध्ये वाद विकोपाला गेला. यावेळी पतीने पत्‍नीच्या चेहऱ्यावर ॲसिडचा हल्‍ला केला. यामध्ये पत्‍नी जखमी झाली असून, तीच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT