Latest

सूर्य नमस्कार कार्यक्रमात ७५ लाख लोकांचा सहभाग

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मकर संक्रांतीचे औचित्य साधत आज शुक्रवारी (दि.१४) रोजी सूर्य नमस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ७५ लाख लोकांनी सहभाग घेतला आहे.

आयुष मंत्रालयाकडून विविध देशांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही सकाळी सूर्य नमस्कार घातला. या कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय योग संघ, राष्ट्रीय योग क्रिडा संघ, योग प्रमाणन बोर्ड, फिट इंडिया या संस्थांचा समावेश होता.

काल स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधत देशभरात एक कोटी लोक सूर्य नमस्कार करणार असून जवळपास ७५ लाख लोक यात सहभागी होतील असा अंदाज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला होता. हा अंदाज सफल झाला आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या काळात लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा कार्यक्रमात घेण्यात आला होता.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT