Latest

WhatsApp च्या ५० कोटी युजर्सचा डेटा फोन नंबरसह लीक, होत आहे ऑनलाइन विक्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲप विषयी आतापर्यंतचा सर्वांत मोठं डेटा उल्लंघनचं प्रकरण प्रकरण समोर आलं आहे. सायबर न्यूजच्या एक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जवळपास ५० कोटी व्हॉट्सॲप युजर्सचा डेटा फोन नंबरसह लीक झाला आहे आणि तो ऑनलाईन विक्रीसाठी तयार आहे. सायबरन्यूजच्या रिपोर्टनुसार, फेमस हॅकिंग फोरमवर विक्री करण्यासाठी तयार डेटाबेसमध्ये ८४ देशांच्या फोन नंबरसह (WhatsApp) युजर्सच्या माहितीचा समावेश आहे. विक्री करण्यासाठी डेटा ठेवणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, अमेरिकेतून ३२ मिलियन युजर्सचे रेकॉर्ड्स आहेत. यामध्ये इजिप्त, इटली, फ्रान्स, युके, रशिया आणि भारताच्या लाखो युजर्सचा डेटा समाविष्ट आहे. (WhatsApp )

किती आहे डेटाबेसची किंमत?

रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेचा डेटासेट ७ हजार डॉलरमध्ये उपलब्ध आहे. तर ब्रिटन डेटासेटची किंमत अडीच हजार डॉलर असेल. सायबरन्यूजने म्हटलं की, जेव्हा त्याने विक्रेता (सेलर) शी संपर्क केला, तेव्हा त्याने पुरावे म्हणून १ हजार ९७ ब्रिटनमधील नंबर शेअर केले. यानंतर त्या नंबरांचा शोध घेतला आणि पुष्टी केली तर ते सर्व व्हॉट्सॲप अकाऊंटचे नंबर असल्याचे समोर आले.

हॅकरला कसे मिळाले नंबर?

हॅकरने सांगितलं नाही की, त्याने कशाप्रकारे डेटा मिळवला. याप्रकारच्या माहितीचा वापर नेहमी सायबर क्राईमसारख्या स्मिशिंग आणि विशिंगसाठी केलं जातं. दोन्हींमध्ये युजर्सना एक टेक्स्ट मेसेज पाठवणं आणि त्यांना एका लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितलं जातं. त्यानंतर युजर्सना आपलं क्रेडिट कार्ड वा अन्य वैयक्तिक माहिती देण्यासाठी सांगितली जाते.

आधीही व्हॉट्सॲप डेटा लीक

हे पहिले प्रकरण नसून मेटाचं नेतृत्व असणाऱ्या प्लॅटफॉर्म डेटा लीक झाला होता. मागील वर्षी भारतात तथाकथित ६० लाख रेकॉर्डसह ५० कोटींहून अधिक फेसबुक युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक झाला होता. लीक झालेल्या डेटामध्ये फोन नंबर आणि इतर माहिती समाविष्ट होती.

SCROLL FOR NEXT