Latest

लातूर : एसटी-कारचा भीषण अपघात; तुळजापूरला दर्शन घेऊन परतताना ५ जणांवर काळाचा घाला

निलेश पोतदार

लातूर; पुढारी वृत्तसेवा : उदगीरहून चाकूरला जाणाऱ्या एसटी बसची व तुळजापूरहून उंदीरकडे येणाऱ्या कारची समारोसमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाचजण ठार झाले. उदगीर नळेगाव रोडवर आज (मंगळवार) सकाळी हा भीषण अपघात झाला.

बस क्रमांक एम एच २० बीपी १३७५ ही उदगीर आगाराची बस उदगीर होऊन चाकूरकडे जात होती. ती अहमदपूर पाटीच्या पुढे आली असता, तिला तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या स्विफ्ट कारने (क्रमांक का एम एच २४ एबी ०४०८) समोरून जोराची धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला व कारमधील पाच ही प्रवासी ठार झाले. या अपघातात कारमधील सर्वजण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी असून, ते तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला.

या अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 

अलोक तानाजी खेडकर, रा. संत कबीर नगर,उदगीर
अमोल जीवनराव देवक्तते, रा. रावनकोला,
कोमल व्यंकट कोदरे, रा. दोरणाळ ता. मुखेड
यशोमती जयवंत देशमुख, रा. यवतमाळ
नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार, रा. बिदर रोड, उदगीर अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT