Latest

nagpur corona : नागपुरात २८ कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची चिंता वाढली

backup backup

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोना बाधितांची संख्या कमी असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून दोन आकडी येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. (nagpur corona)

मंगळवार २८ डिसेंबर रोजी शहरात ३४ कोरोना बाधित आढळले. ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील धरून रूग्णसंख्या ४४ होती. बुधवार २९ रोजी शहरातील २४ सह एकूण २७ आणि गुरूवार ३० रोजी शहरातील २६ सह एकूण २८ कोरोनाबाधित निघाले.

२३ डिसेंबरपर्यत एक आकडी असलेली कोरोना बाधिताची संख्या २४ डिसेंबरपासून दुहेरी झाली आहे.

२४ डिसेंबर रोजी १२, २५ डिसेंबर २४, २६ डिसेंबर रोजी ३२, २७ डिसेंबर रोजी १२ कोरोना बाधित नोंदवण्यात आले.

चाचण्यांची संख्या तेवढीच असताना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. (nagpur corona)

SCROLL FOR NEXT