Nagpur : नागपूरमध्ये साडेसात लाखांचा गांजा पकडला, मास्क आणि सॅनिटायझरखाली होता लपवला

Nagpur : नागपूरमध्ये साडेसात लाखांचा गांजा पकडला, मास्क आणि सॅनिटायझरखाली होता लपवला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नववर्षाचे स्वागत करताना नशा करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरखाली लपवून नेण्यात येत असलेला गांजा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पकडला. ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता राज्य सरकारच्या निर्देशानुसार नववर्षाचे स्वागत समारंभ तसेच पार्ट्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. (Nagpur)

बिअरबार रात्री १२ वाजेपर्यत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्के उपस्थितीच्या अटीमुळे मद्य व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.

Nagpur : सॅनिटायझर आणि मास्कमधून गांजा लपवून नेत असताना कारवाई

मद्य सेवनासोबत गांजालाही गंजेट्टीकडून मोठी मागणी असते. मात्र, सध्या सडकी सुपारी, तंबाखू तसेच गांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर असल्याने विक्रेते वेगवेगळ्या आयडीया लढवित आहेत.

कारच्या सीटवर सॅनिटायझर आणि मास्क ठेवून आतमध्ये गांजा लपवून नेणाऱ्या दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरी जवळ पवन कश्यप आण दीपक शर्मा हे दोघे कारमधून गांजा तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बुटीबोरी वाय पॉइंटजवळ नाकाबंदी सुरू केली. त्यात पोलिसांनी केलेल्या तपासणीअंती कारच्या सीटखाली गांजा लपवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ७५ किलो गांजा जप्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news