Latest

Pune Metro : खडकवासला-हडपसर-खराडी मेट्रो मार्गावर 22 स्टेशन

अमृता चौगुले

पुणे : 'खडकवासला-हडपसर-खराडी' या मेट्रो मार्गाने सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना केवळ हडपसर-वाघोलीपर्यंत पोहचता येणार नसून, त्यांना पिंपरी आणि हिंजवडीच्या औद्योगिक पट्ट्यापर्यंतसुद्धा सहज पोहचता येणार आहे. खडकवासला-हडपसर मेट्रो मार्गाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल दै. 'पुढारी'कडे आला असून, त्यात या मार्गावर 22 स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे.

'खडकवासला-हडपसर-खराडी' हा मेट्रो मार्ग 'पिंपरी-स्वारगेट' या मार्गाला स्वारगेटजवळ मिळणार आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर राहणार्‍या काही लाख पुणेकरांना हडपसर परिसरात तसेच त्यापुढे नगर रस्त्यावरील वाघोलीपर्यंत पोहचता येणार आहे. तसेच, सिंहगडच्या रहिवाशांना आगामी काळात स्वारगेटला उतरून थेट निगडीपर्यंत पोचता येईल. याचाच अर्थ पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात कामाला जाणार्‍या सिंहगड रस्त्यावरील रहिवाशांना थेट पिंपरीत जाता येणार आहे.

त्याचप्रमाणे हडपसर भागातील उद्योग-व्यवसायानिमित्त वाघोलीपर्यंत जाणार्‍या रहिवाशांना प्रवासाची सोय होणार आहे. त्याचप्रमाणे सिंहगड रस्त्यावर राहणार्‍या आणि हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना 'खडकवासला-स्वारगेट-शिवाजीनगर-हिंजवडी' असा प्रवास करता येणार आहे. पीएमआरडीए विकसित करीत असलेल्या मेट्रो मार्गाचा या वेळी वापर होईल.

त्याचप्रमाणे 'वनाज-रामवाडी' मार्गावरील एसएनडीटी स्टेशनपासून वारजे मार्गाने सिंहगड रस्त्याने माणिकबागेपर्यंत नवा फाटा विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग ते खडकवासला या भागातील नागरिकांना कर्वे रस्तामार्गे शिवाजीनगर गाठता येईल आणि तेथून नगर रस्त्यावर वाघोलीपर्यंत किंवा दुसर्‍या मार्गाने जाता येईल.

अशी झाली वाटचाल

सर्वंकष आराखडा मनपाला सादर
8 ऑगस्ट 2022
पालिकेला प्रकल्पाचे सादरीकरण
27 सप्टेंबर 2022
सुधारित दुरुस्त्यांसह महापालिकेला सादर केलेला आराखडा
9 जानेवारी 2023

खडकवासला-हडपसर-खराडी व एसएनडीटी-वारजे-माणिकबाग या दोन्ही मार्गांचा डीपीआर महापालिकेला साद करण्यात आला आहे. त्यानंतर यासंदर्भात चर्चा झाली आहे. महापालिकेने हा आराखडा मंजूर केल्यावर तो राज्य शासनाकडे जाईल. तेथून मंजुरी मिळाली की केंद्र शासनाकडे जाईल. तेथे मंजुरी मिळाली की त्याची अंमलबजावणी केली जाईल.
                         – हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

अशी आहेत स्थानके

खडकवासला-हडपसर-खराडी मार्गावरील स्थानके : 22

खडकवासला
दळवीवाडी
नांदेड सिटी
धायरी फाटा
माणिकबाग
हिंगणे चौक
राजाराम बि—ज
पु. ल. देशपांडे उद्यान
दांडेकर पूल
स्वारगेट नॉर्थ
सेव्हन लव्हज चौक
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड
रेस कोर्स
फातिमानगर
रामटेकडी
हडपसर
मगरपट्टा साऊथ
मगरपट्टा मेन
मगरपट्टा नॉर्थ
हडपसर रेल्वे स्टेशन
साईनाथनगर
खराडी चौक

पौड फाटा
कर्वे पुतळा
डहाणूकर कॉलनी
कर्वेनगर
वारजे
दौलतनगर

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT