Latest

देशातील १४० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तपास कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २०२३ या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाने १४० पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना सन्मानित केले जाणार आहे. गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन मिळावे तसेच तपास कार्यातील अशा उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने २०१८ पासून दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी पदकांची घोषणा केली जाते.

हा पुरस्कार प्राप्त करणार्‍या कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये, केंद्रीय गुप्तचर विभागातल्या (सीबीआय) १५, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए)१२, उत्तर प्रदेशातील १०, केरळ आणि राजस्थानच्या प्रत्येकी ९, तामिळनाडूतील ८, मध्य प्रदेशातील ७, गुजरात राज्यातून ६ आणि उर्वरित इतर राज्ये, केंद्रशासित प्रदेश, संस्था यांचा समावेश आहे. या पुरस्कार यादीमध्ये २२ महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा पदक घोषित करण्यात आले नाही.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT