Latest

दुर्मिळ आजाराने ग्रस्त मुलाच्या उपचारासाठी अमेरिकेतील अज्ञात व्यक्तीकडून ११ कोटींची मदत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वार्थासाठी सध्याच्या दुनियेत कोण काय करील याचा नेम नाही. परंतु गरजू आणि गरिबांसाठी मदतनिधी तसेच वैद्यकीय उपचारासाठी मदत देणारे समाजसेवक, दानशूर व्यक्ती काही मोजक्याच आहेत. संकटकाळात मदतीला धावलेली व्यक्ती देवापेक्षाही मोठी समजली जाते. अशाच केरळमधील एका दाम्पत्यासाठी अमेरिकेतील एक व्यक्ती देवदूत म्हणून पुढे आली आहे. या दांम्पत्याचा १६ महिन्यांचा मुलगा दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. पण उपचारासाठी पैसे नव्हते. एका अमेरिकन व्यक्तीने या मुलाच्या उपचारासाठी अज्ञातपणे ११.६ कोटी रुपये दिले आहेत.

सारंग मेनन आणि अदिती यांचा एकुलता एक मुलगा स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी (SMA) टाईप 2 या एका दुर्मिळ अनुवांशिक मज्जातंतूंच्या आजाराने ग्रस्त आहे. ज्यामुळे शरीर कमकुवत होते आणि हातपाय हलवता येत नाहीत. या उपचारासाठी आवश्यक असलेले औषध नोव्हार्टिसने निर्मित झोलजेन्स्माच्या एका डोसची किंमत सुमारे १७.५ कोटी रुपये आहे. एवढे पैसे कसे जमा करावे हा प्रश्न या कुटुंबाला पडला होता. क्राउडफंडिंगद्वारे ५० हजार लोकांनी ५ कोटीं रूपये जमा केले. पण ही रक्कम कमी पडत होती. अशावेळी एका अमेरिकन व्यक्तीने उपचारासाठी अज्ञातपणे ११.६ कोटी रुपये दिले आहेत. याची माहिती कुटुंबीयांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली असून आनंद व्यक्त केला आहे. मुलाच्या पालकांनी सांगितले की, "आम्ही तुम्हा सर्वांसोबत आनंदाची बातमी शेअर करू इच्छितो की आम्हाला एका अज्ञात दात्याकडून १.४ दशलक्ष डॉलरची महत्त्वपूर्ण देणगी मिळाली आहे. त्यांच्या उदारतेमुळे आम्हाला निर्वाणच्या उपचारासाठी आवश्यक निधी उभारण्याचे ध्येय पूर्ण करण्यात मदत झाली आहे."

जगातील सर्वात महागडे औषध म्हणून ओळखले जाणारे नोव्हार्टिस कंपनीचे झोलजेन्स्मा औषध 'स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी (SMA) प्रकार २' च्या उपचारात वापरले जाते. या औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे १७.५ कोटी रुपये आहे. औषध भारतात पोहोचण्यासाठी सुमारे २० दिवस लागतात. पैशांची व्यवस्था झाल्यानंतर कुटुंबाने केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि आयात-निर्यात विभागाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून हे औषध अमेरिकेतून मागवण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT