Latest

Lalit Patil Drug Case : ससूनमध्ये असा घडला घटनाक्रम; घ्या जाणून?

अमृता चौगुले

पुणे : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी रात्री ससूनमधून पळून गेला. त्यानंतर ससूनमध्ये घडलेल्या घटनाक्रमातून दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाटीलला चेन्नईमधून अटक झाल्यानंतर पुन्हा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

30 सप्टेंबर ः ससूनजवळ 2 कोटींचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक.
1 ऑक्टोबर ः ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलचा सहभाग असल्याचे आणि तो ससूनमधून ड्रग रॅकेट चालवत असल्याचे उघड.
2 ऑक्टोबर ः ललित पाटील एक्स-रे काढण्याच्या निमित्ताने वॉर्डमधून बाहेर आला आणि रात्री आठच्या दरम्यान रुग्णालयातून पसार झाला.
3 ऑक्टोबर ः डीनकडून खुलासा नाही. वैद्यकीय संचालनालयाकडून डीन वगळता कोणीही टिपण्णी न करण्याच्या सूचना.
3 ऑक्टोबर ः वॉर्ड क्रमांक 16 मध्ये नऊ कैदी किरकोळ आजार असतानाही दोन ते नऊ महिने मुक्काम ठोकून असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिध्द करत ससून प्रशासनाला दणका दिला.
4 ऑक्टोबर ः वॉर्डमधील कैद्यांबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयास सादर.
5 ऑक्टोबर ः कैद्यांच्या वॉर्डसाठी नियमावली तयार करण्याचा ससूनचा निर्णय.
6 ऑक्टोबर ः विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून ससूनची झाडाझडती.अहवाल सादर करण्याचा आदेश.
7 ऑक्टोबर ः ससूनकडून विभागीय आयुक्तांना केवळ औषधसाठा, मनुष्यबळ अहवाल सादर; कैद्यांचा अहवाल सादर केलाच नाही.
8 ऑक्टोबर ः 'पुढारी'च्या दणक्यानंतर नऊपैकी पाच कैद्यांची कारागृहात रवानगी.
9 ऑक्टोबर ः कैद्यांचा अहवाल केवळ न्यायालयात सादर करण्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून स्पष्ट.
10 ऑक्टोबर ः सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी ललित पाटीलसाठी फोन केल्याचा आरोप केला.
10 ऑक्टोबर ः दोषी डॉक्टरांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी.
11 ऑक्टोबर ः ड्रग्ज प्रकरण चौकशीसाठी शासनातर्फे विशेष समिती स्थापन.
13 ऑक्टोबर ः पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून डीनची झाडाझडती.
14 ऑक्टोबर ः शासनाच्या समितीची ससूनला भेट; 80 जणांचे नोंदवले जबाब.
18 ऑक्टोबर ः ललित पाटील याला चेन्नईमधून अटक.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT