lalit modi and sushmita sen  
Latest

Sushmita Sen : ललित मोदींची सुषसाठी I Love You ची पोस्ट, ती म्हणाली…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदी यांनी काही आठवड्यांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोबतच्या नात्याची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर अभिनेत्रीसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे त्यावेळी दोघांची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स ललित मोदींना ट्रोल करत होते. आता ललित यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिल्याने पुन्हा गरम चर्चा रंगलीय. त्यांनी पोस्टमध्ये आय लव्ह यू लिहिल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. (Sushmita Sen)

खरंतर, शुक्रवारी ललित मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये मोठ्या अक्षरात लिहिले आहे, 'and i said i love yoy'. ही पोस्ट समोर येताच नेटकऱ्यांनी ललित मोदींना विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, या पोस्टवर सुष्मिता सेनने लाईक केलं आहे.

ललित मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये आय लव्ह यू म्हणत काही फोटो शेअर केले आहेत. एका हॉटेलचे हे फोटो असून त्यामध्ये सुंदर स्पा दिसत आहे. नेटकऱ्यांनी हे फोटो पाहू विचारलं की, तुम्ही सुष्मितासाठी हे स्पा घेतलं आहे का?

या फोटोंसोबत त्यांनी कॅप्शन लिहिलीय-The most beautiful #hotel and #spa in the #mountains in #gstaad – @thealpinagstaad – here are a few pictures to enjoy. The neon sign "and I said I love you !" is in the #lobby. Elegant and tasteful is the word for this #hotel. Must try if ever coming to #gstaad #switzerland ??????#thealpinagstaad and most amazing #spa too.

या पोस्टला नेटकऱ्यांकडून कोणत्या प्रतिक्रिया येत आहेत, पाहुया-amazing place enjoy, But still she won't add you to her DP and Bio ? #justiceforLalitmodi, Why she is not open about the relationship?, Enjoy ❤️❤️❤️, Sushmita medam kaha he sir.?, Leliyaaaaa uske liye???? Sush ke liye?, bhai doob gaye hai pyaar me? अशा कमेंट्स दिल्या आहेत.

मध्यंतरी, ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे मालदीव येथील एकत्र सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे दोघांनी लग्न केल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT