Latest

Kurundwad Municipal Council: ‘माझी वसुंधरा अभियाना’त कुरुंदवाड नगरपरिषद पुणे विभागात अव्वल

अविनाश सुतार

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानात कुरुंदवाड नगरपरिषदेने (Kurundwad Municipal Council) पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तर, राज्यात चौथा क्रमांक मिळविला. पालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांनी दिली.

दरम्यान, (Kurundwad Municipal Council) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने 'माझी वसुंधरा योजने'चा निकाल जाहीर केला आहे. शहरात वृक्ष लागवड, पर्यावरण पूरक बोलक्या भिंती, चौकांची स्वच्छता, 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' असे फलक लावले आहेत. शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या खुल्या जागांमध्ये नगरपालिकेने उद्याने उभी केली आहेत. ओला व सुका कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. शहर हागणदारी मुक्त, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वनसंवर्धन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता, विजेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रोत्साहन देणे, असे विविध प्रकल्प राबवलेले आहेत.

याची दखल घेत नगर परिषदेला पुणे विभाग स्तरावर प्रथम, तर राज्यस्तरावर चौथा क्रमांक देण्यात आला आहे. पालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या यशासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चौहान,  अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी अथक परिश्रम घेतले. नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT