Kunya Rajachi Ga Tu Rani 
Latest

Kunya Rajachi Ga Tu Rani : मंगळसूत्र कोणाचं?; गोळी लागलेली गुंजा काय देणार उत्तर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'कुन्या राजाची गं तू राणी' ( Kunya Rajachi Ga Tu Rani ) ही मालिका चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी भारदस्त भूमिका साकारलीय. सध्या मालिकेत कबीर सरपोतदार गुंजाला तिच्या गावी डोंगरवाडीला सोडायला आणि पोलिस आणि आदिवासी कार्यकर्ता सत्यजित यांच्यात मधस्थी करण्यास गेलेला असतो. दरम्यान पोलिस आणि सत्यजितच्या साथीदारामध्ये गोळीबार होता. या गोळीबारातून कबीर आणि गुंजा सुखरूप मधल्या वाटेने बाहेर पडतात. यानंतर गुजां, तिची आई बाभळी, कडूआजी आणि बुद्यामध्ये कड्याक्याचे भांडण होते. याचदरम्यान बुद्याने गुजांवर बंदुक चालवतो आणि यात ती जखमी होते. गुंजाला कबीर हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करतो. चाहत्यांनी मात्र, गुंजाच्या दिर्ध आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे मृण्मयच्या हाती लागलेले मंगळसूत्र कोणाचं आहे? असा प्रश्न मृण्मयीच्या आईला पडला आहे.

संबंधित बातम्या 

पोलिस आणि सत्यजितच्या साथीदारामध्ये झालेल्या गोळीबारानंतर गुंजा कबीरला पुन्हा एकदा गावाला पाठवण्याची तयारी करून त्याला सोडायला जाते. दरम्यान कबीरही गुजांचा निरोप घेवून निघतो. मात्र, गुंजा, तिचा आई बाभळी आणि कडूआजी याच्यांसोबत बुद्या यांचे जोरदार कडाक्याचे भांडण होते. यादरम्यान कबीर बदुंकीच्या गोळीचा आवाज ऐकून परत आहे त्या ठिकाणीच येतो. लगेच बुद्या कबीरवर गोळी झाडतो. दरम्यान कबीरच्यामध्ये गुंजा येते आणि तिला गोळी लागते. यात ती जखमी होते. कबीर तिला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करतो.

डॉक्टरांनी सुरूवातीला गुंजाची तब्येत खुपच क्रिटीकल असल्याचे सांगितले जाते. एकिकडे, कबीरच्या घरचे गुंजाच्या अवस्थेला कोण जबाबदार आहे?, ही घटना कशी काय घडली? या सर्व प्रश्नाची उत्तरे कबीरच्या आईला पडतात. यानंतर कबीर या सगळ्या प्रश्नाची उकळ करतो. यात तो सांगतो की माझ्यावरची गोळी गुंजाने झेलली आहे. तर दुसरीकडे मृण्मय आई मोठ्याने दंगा आणि ओरडत कबीरला अनेक प्रश्न विचारताना दिसतेय. तिला तिच्या लेकीच्या संसाराची काळजी असल्याने तिने अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले आहेत. दरम्यान हॉस्पीटलमध्ये असताना मृण्मयीच्या आईने गुंजाला मंगळसूत्र कोणाचं आहे? असा प्रश्न देखील विचारते. यावर गुंजा काय उत्तर देणार? याकडे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहाचली आह.

गुंजा लवकर बरी व्हावी म्हणून तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत कबीरची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी, गुंजाची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग, मृण्मयची भूमिका अभिनेत्री पौर्णिमा डे, बाभळीची भूमिका अभिनेत्री समिधा गुरू आणि सत्यजीतच्या भूमिकेत संजय खापरे दिसत आहे. ( Kunya Rajachi Ga Tu Rani )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT