Music maestro Rashid Khan : ‘आओगे जब तुम…’फेम गायक राशिद खान यांचे कॅन्सरने निधन

Music maestro Rashid Khan
Music maestro Rashid Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायक राशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. क्लासिकल गायक राशिद खान यांना डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Music maestro Rashid Khan) मागील काही काळापासून ते प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांची प्रकृतीही गंभीर होती. कोलकातामधील एका रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवले होते. गायक राशिद खानने इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट गाणी दिली होती. यामध्ये सर्वात हिट 'जब वी मेट' चित्रपटातील 'आओगे जब तुम ओ साजना' या गाण्याचा समावेश आहे. (Music maestro Rashid Khan) राशिद खान यांच्या पार्थिवावर १० जानेवारी रोजी अंत्यसंस्कार केले जातील.

संबंधित बातम्या –

'तोरे बिना मोहे चैन' नही यासारखे सुपरहिट गाणेदेखील त्यांच्या नावावर आहे. शाहरुख खानचा चित्रपट माय नेम इज खान मध्ये त्यांची गाणी आहेत. 'राज 3', 'कादंबरी', 'शादी में जरूर आना', 'मंटो', 'मीटिन मास' यासारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.

उस्ताद राशिद खान यांना २०२२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील महिन्यात सेरेब्रल ॲटॅक आल्यानंतर उस्ताद राशिद खान यांची तब्येत खूप बिघडली होती. सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार केले होते. नंतर त्यांनी कोलकाताच्या एका रुग्णालयात आपले उपचार सुरु ठेवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news