पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर 'गहरारिया' (Gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच निर्मात्यांनी रिलीज केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी खूप कौतुक केले, तर अनेकांना ते खास वाटले नाही.
अशा परिस्थितीत अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया शेअर केली. केआरकेने ट्विट करून दीपिका पदुकोणची खिल्ली उडवली असून रणबीर कपूरचे नावही त्यात ओढले आहे.
आपल्या ट्विटमध्ये केआरकेने दीपिका पदुकोणची खिल्ली उडवत म्हटले आहे की, 'गहरारिया' ट्रेलर पाहिल्यानंतर रणबीर कपूरने स्वतःलाच म्हटले असेल, उपरवाले धन्यवाद ! दीपूसोबत ब्रेकअप करून वाचवलस. नाहीतर आज असा इज्जतीचा भर बाजारात लिलाव झाला असता.
याआधी एका ट्विटमध्ये केआरकेने लिहिले होते की, 'आज मला निर्लज्ज लोकांच्या "गहरारिया' चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करण्यासाठी वेळ मिळाला नाही, परंतु, मी उद्या त्याचा रिव्ह्यू करेन. हे गंजेडी लोक कधीच सुधरणार नाहीत.
दीपिका पदुकोणचा हा चित्रपट ११ फेब्रुवारीला Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे. हा चित्रपट शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केला असून करण जोहरने निर्मिती केली आहे. बऱ्याच दिवसांनंतर दीपिका पदुकोण ऑनस्क्रीन आपल्या हॉटनेसने प्रेक्षकांना वेड लावताना दिसणार आहे. या चित्रपटापूर्वी दीपिका पदुकोण शेवटची रणवीर सिंहच्या '83'मध्ये दिसली होती. या चित्रपटात दीपिकाने रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
हे ही वाचलं का ?