माझे इतके मोठे स्तन नाहीत मग ‘तो’ रोल कसा करू ! नीना गुप्तांच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद | पुढारी

माझे इतके मोठे स्तन नाहीत मग 'तो' रोल कसा करू ! नीना गुप्तांच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जातात. आपले म्हणणे मांडण्यासाठी त्या कोणत्याही प्रसंगाची आणि वेळेची वाट पाहत नाहीत. मनात जे येईल ते लगेच बोलून जातात. तथापि, अभिनेत्रीचा असा बोल्डनेस कधी-कधी आजूबाजूच्या लोकांसाठी अडचणीचा ठरतो. असाच द कपिल शर्मा शोमध्ये नीना गुप्ता पोहोचल्या तेव्हा त्यांनी कपिलच्या प्रश्नाला असे उत्तर दिले, की सगळेच अवाक झाले.

बेधडक नीना गुप्ता

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता ज्या काही बोलतात ते सर्व बिनधास्तपणे असते. परिणाम काहीही असो. कोणी काय विचार करत असले तरी त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही त्यांच्या आयुष्याची डायरी काढली तरी ते लक्षात येईल. त्यांनी लग्न न करताच मुलीला जन्म कसा दिला. प्रदीर्घ गॅपनंतर गजराज रावसोबतच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्यानंतर त्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या.

नीना गुप्तांच्या उत्तराने कपिल शर्मा क्लीनबोल्ड

कंगना राणावत पंगा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नीना गुप्ता द कपिल शर्मा शोमध्ये गेल्या होत्या. यादरम्यान त्यांनी कपिलच्या एका प्रश्नाला इतके चोख उत्तर दिले होते की ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. कपिलने नीना गुप्ताला विचारले की, तुमच्याबद्दल अफवा आहे की तुम्हाला हॉलीवूड सिरीज बेवॉचमध्ये पामेला अँडरसनची भूमिका करायची आहे. याला प्रत्युत्तर देताना नीना जे बोलली ते ऐकून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. नीना गुप्ता म्हणाल्या की, माझ्याकडे पामेलासारखे मोठे बुब्स नाहीत ज्यामुळे मी काम करु शकेन.

कपिलची बोलती बंद

हे उत्तर ऐकून कपिल सुद्धा लाजतो आणि म्हणतो की काही शाकाहारी उत्तर द्यावे. तेव्हा नीना गुप्ता म्हणाल्या की, प्रश्नच नॉनव्हेज विचारला आहे, तर उत्तर व्हेज कसे असेल ? असे नीना प्रत्युत्तर देतात. नीना गुप्ता देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत राहिली आहे. सर्वप्रथम नीना गुप्ता अभिनेते आलोक नाथ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, नीना गुप्ता आणि आलोक नाथ ८०च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही.

हे ही वाचलं का ?

Back to top button