Latest

Kolhapur Style Proposal : कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं हायवेवर ५० बाय २५ फुटाचे होर्डिंग लावून केलं प्रपोजं !

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : हे कोल्हापूर हाय! इथ काय नाय घडतं? जगात कोठं काय होतं नायं ते कोल्हापुरात हुतयं. जंगी उत्सव, जंगी मिरवणुका, जंगी हाणामाऱ्या पण तेवढीच काटाकिर्र मैत्री, जंगी खानपानं हे सगळं जंगीचं कोल्हापूरमध्ये केलं जातयं. आता कोल्हापुरातल्या 'या' पठ्ठ्यानं चक्क जंगी ५० बाय २५ फुटाचे होर्डिंग (Kolhapur Style Proposal) लावतच पोरीला प्रपोजं केलयं. असं हे आगळं वेगळं प्रपोजं बघून पोरीनं पण, लग्नासाठी होकार दिलाय. होर्डिंगच्या माध्यमातून प्रपोज केलेल्या 'या' पठ्ठ्याची चर्चा अवघ्या महाराष्ट्र भर सुरु झाली आहे.

कोल्हापूरच्या सौरभ कसबेकर याने थेट होर्डिंगवर (Kolhapur Style Proposal) 'मॅरी मी उत्कर्षा' असे लिहित हे होर्डिंग कोल्हापूर – सांगली महामार्गावर झळकावले आणि अनोख्या पद्धतीने या होर्डिंगच्या समोर उत्कर्षाला लग्नासाठी प्रपोज केले. सौरभच्या अनोख्या कल्पनेपुढे उत्कर्षा देखिल घायळ होत त्याला लगेच लग्नासाठी हो म्हणाली.

कोल्हापूर मधील सौरभ कसबेकर आणि सांगलीची उत्कर्षा हे दोघे सांगलीच्या बुधगाव येथील वसंतदादा पाटील या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिर्पाटमेंटमध्ये शिक्षण घेत होते. विशेष गोष्ट म्हणजे एका डिर्पाटमेंटमध्ये दोघे शिकत असून देखिल दोघांचा एकमेकांशी जास्त ओळख नव्हती. मात्र सौरभच्या मनात उत्कर्षाने घर केले होते. इंजिनिअरिंग पुर्ण झाल्यावर सौरभच्या घरातल्यांनी त्याच्या लग्नाची तयारी सुरु केली. घरातल्यांनी सौरभला कोण मुलगी मनात असेल तर सांग आपण पाहुया असे म्हणाले. सौरभने वेळ न दौडत उत्कर्षा विषयी सांगून टाकले. (Kolhapur Style Proposal)

सौरभच्या घरातील लोकांनी देखिल उत्कर्षाच्या घरी रितसर लग्नाची मागणी घातली. उत्कर्षा आणि तिच्या घरातील लोकांनी त्वरीत होकार दिला नाही. पुढे अनेक प्रयत्न केल्यानंतर काही दिवसांनी अखेर उत्कर्षाच्या घरातल्यांनी सौरभला होकार दिला. पण, या रितसर गोष्टीत काही मजा नाही म्हणून सौरभने आयड्याची कल्पना लढवत अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करायचे ठरवले.

अखेर कोल्हापूर – सांगली महामार्गावरील होर्डिंगवर 'मॅरी मी उत्कर्षा' असे लिहित अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला त्या होर्डिंग शेजारीच सौरभने प्रपोज केले. या अजब प्रकारने भारवलेल्या उत्कर्षाने देखिल यावेळी सौरभच्या प्रेमाचा तात्काळ स्विकार करत त्याला लग्नासाठी होकार दिला.

सध्या सर्वत्र या दोघांच्या प्रपोजचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या महाराष्ट्रभर या अनोख्या जंगी होर्डिंगद्वारे प्रपोजच्या कल्पनेचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT