कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा कर्नाटकातून गांजाची तस्करी करणाऱ्या राजारामपुरी येथील (23 वर्षीय) तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप जाधव, हवालदार प्रशांत घोलप, परशुराम गुजरे, सुशांत पांडव, गजानन गुरव यांच्यासह पथकाने फुलेवाडी परिसरात पाठलाग करून गणेशाचार्य राहणार राजारामपुरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा किलो तयार गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
संशयिताने हा गांजा कर्नाटकातून कोल्हापुरात आणला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या तस्करी मागे सीमा भागातील मोठी टोळी कार्यरत असावी असाही पोलिसांचा कयास आहे.
गणेशचार्य हा मूळचा राजारामपुरी परिसरातील असून, तस्करीच्या गुन्ह्यात तो प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. मोलमजुरी करणारा हा तरुण तस्करीत कसा काय वळाला याचाही पोलीस शोध घेत आहेत. यामागे काही स्थानिक तस्करांचे लांगेबांदे असावेत असाही संशय आहे.
हेही वाचा :