राशिवडे; पुढारी वृतसेवा : भोगावती सहकारी साखर कारखाना शाहुनगर परिते (ता.करवीर) या संस्थेच्या संचालक मंडळाची संख्या २१ वरुन २५ झाली आहे. करवीर व राधानगरी तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याचे दोन्ही तालुक्यात प्रत्येकी दहा असे समान वीस संचालक असणार आहेत.
भोगावतीच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. नव्या ९७ व्या घटनादुरुस्ती,पोटनियम २६ नुसार संचालक मंडळाची संख्या वाढली आहे. यामध्ये संस्था गट रद्द करण्यात आला असुन घटनादुरुस्तीनुसार संस्था मतदाराना पंचवीस मताचा अधिकार मिळणार आहे. उत्पादक गटातुन राधानगरी तालुक्यातील कौलव गट ३, राशिवडे बु गट ४, कसबा तारळे गट ३, तर करवीर तालुक्यातुन कुरुकली गटातुन ४,सडोली खालसा गटातुन ४ तर हसुर दुमाला गटातुन २ अशी एकुण २० संचालक निवडुन द्यायची संख्या असणार आहे. तर अनुसूचित जाती जमाती १, महिला प्रतिनिधी २, इतरमागास प्रतिनिधी १, भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रतिनिधी १ याप्रमाणे पाच संचालक निवडले जाणार आहेत. त्यामुळे २१ संचालक मंडळा ऐवजी ही संख्या २५ इतकी होणार आहे. तर तज्ञ संचालक दोन आणि कार्यलक्षी म्हणजेच कामगार प्रतिनिधींची संख्या दोन असणार आहे.
हेही वाचा