Latest

कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव आघाडीवर, पण बावड्यात विजयाचे पोस्टर झळकले !

backup backup

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत पहिल्या दोन फेरीमधील आकडेवारी समोर आली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम राखली असून त्यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते मिळाली आहेत.

दुसऱ्या फेरी अखेर 5139 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत. दरम्यान जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टरही झळकू लागले आहेत. कसबा बवड्यातील पिंजर गल्ली कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, बाल शिवाजी तरुण मंडळ शाहू तरुण मंडळ छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटी जय शिवराय तरुण मंडळ जयहिंद स्पोर्ट कैलासवासी सुरेश मित्र मंडळ अचानक ग्रुप, गजू ग्रुप यांनी पोस्टर लावले आहे.

दरम्यान, पालकमंत्री सतीश पाटील यांचा कसबा बावडा हा हक्काचा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात अवघ्या पाच हजारांचे लीड जयश्री जाधव यांना मिळाले आहे. यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

? कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

वेळ: 8.49 AM

फेरी 2

फेरीतील झालेले मतदान: 8141
समाविष्ट भाग: कसबा बावडा

१) जयश्री जाधव – 5515
२) सत्यजित कदम – 2513

या फेरीतील लीड:- 3002
फेरी अखेर एकूण लीड:- 5139
मोजलेली मते: 15,922
मोजायची मते: 1,62,620

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT