कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा वाड (ता.शिरोळ) येथे आईला शिवीगाळ करत असल्याच्या रागातून नातवाने आजोबांवर धारदार शास्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यातील जखमी आजोबा बाबू उर्फ कासिम म्हमुलाल चाऊस (वय.76) या वृद्धाचा आज (बुधवार) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 एप्रिल 2024 रोजी हा हल्ला झाला होता. सांगली येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
या प्रकरणी नातू सुरज बादशहा बाणदार (वय 32), गिरीष राजू परीट (वय.24, दोघे रा घोसरवाड) हे दोघेजण अटकेत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
घोसरवाड येथे घराजवळील झाडाजवळ 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाबू चाउस हे बसले होते. यावेळी संशयित आरोपी सूरज बाणदार, गिरीश परीट यांनी धारदार चाकू आणि दगडाने हल्ला करून कपाळावर, नाकावर, ओठांवर वार करून गंभीर जखमी करून तेथून पळ काढला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून जखमी चाऊस यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा :