पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन झाल्याचे संजू सॅमसनने सांगितले. त्याचबरोबर या सामन्यात कोलकाता कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. कोलकात्याच्या प्लेइंग 11 मध्ये चार परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फिल सॉल्ट, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. तर शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ट्रेंट बोल्ट हे राजस्थानकडून खेळताना दिसणार आहेत.
हेही वाचा :