Latest

Kirit Somaiya News : किरीट सोमय्या आक्रमक; संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर आरोप करत अटकेची मागणी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह मुंबई महापालिकेवर आज सकाळी झालेल्या (दि.२१) पत्रकार परिषदेत आरोप केले आहे. त्यांनी म्हंटलं आहे की,"सुजित पाटकर यांनी कोव्हिड सेंटरसाठी खोटी कागदपत्रे दिली आहेत. एकच स्टॅम्प पेपर अनेक करारांसाठी कसा काय वापरला. वापरलेले अनेक स्टॅम्प पेपर बोगस आहेत." त्याचबरोबर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरही आरोप केले आहेत. वाचा सविस्तर बातमी. (Kirit Somaiya News )

भाजप नेते किरीट सोमय्या हे वेळोवेळी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत असतात. त्यांनी आज पुन्हा एकदा त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी त्यांनी ट्विट करत म्हंटलं होत की, "₹१०० कोटीचा कोविड सेंटर घोटाळा, बोगस स्टॅम्प पेपर आणि मुंबई महापालिकेचा "बोगस अहवाल", गुन्हेगारांना वाचविण्याचा बीएमसी चा अट्टाहास. माहिती आणि बोगस अहवाल आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेत घेणार". झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Kirit Somaiya News : कंत्राट कसं काय दिलं?

ते बोलत असताना पुढे असेही म्हणाले की," कोरोना काळात कोविड सेंटर घोटाळा करण्यासाठी खोटी कागदपत्रे देण्यात आली. सुजित पाटकर यांनी कोव्हिड सेंटरसाठी खोटी कागदपत्रे दिली. १०० कोटींचा कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाला. त्यांना अटक करावी.  लाईफलाईन कंपनी सुविधा कुठेही रजिस्टर नाही, त्याची नोंदणी कुठेच नाही तरीही नोंदणी नसलेल्या कंपनीला कंत्राट कसं काय दिलं? असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. बोलताना ते पुढे असेही म्हणाले की, "एकच स्टॅम्प पेपर अनेक करारांसाठी वापरला, वापरलेले अनेक स्टॅम्प पेपर बोगस आहेत. कोरोनाबाबतच्या औषधांच्या खरेदीत अनियमितता आहे. मुंबई महानगरपालिका बाबत तात्काळ कारवाई केली जावी. लोकायुक्तांची मुंबई पालिकेला क्लिन चीट आहे.

तसेच कोरोना काळात पैशांसाठी ठाकरे सरकारने लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे असं म्हणतं त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. रेमडेसीवीर (Remdesivir) ची किंमत कमी का केली नाही, (Remdesivir) चा भ्रष्टाचार  ठाकरे सरकारने केला होता. त्यावेळी अवाच्या सव्वा किंमत वाढविली. याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT