नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) मोहब्बते चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. दरम्यान किम शर्माने (Kim Sharma) सोशल मीडियावर पोल डान्स करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केली आहे.
किम शर्माच्या या व्हिडिओवर चाहते गूळ पाडताना दिसत आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही कमेंट केली आहे. यामुळे किमच्या पोल डान्सची आणि युवराजच्या कमेंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
युवराज म्हणतो वाह काय सूर आहे मॅडम कोणते गाणे म्हणत आहात तुम्ही अशा आशयाची कमेंट युवराजने केली आहे. दरम्यान या कमेंटनंतर हा व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे. युवराजच्या कमेंटवर, एक चाहता म्हणतो युवराज तु तर संपूर्ण मैदानावर ६ चेंडूत ६ षटकार मारला.
किम शर्माने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ "Mid week spin with @aarifa.pole.burnt" हा कॅप्शन टाकत शेअर केला.
दरम्यान यावर व्हीडिओवर युवराजने कमेंट केल्याने जोरदार चर्चा झाली.
युवराज आणि किम यांच्यात काहीतरी सुरू होते अशी चर्चा ही सोशल मीडियावर सुरू होती.
म्हणून किमच्या व्हीडिओवर युवराजच्या कमेंटचा सिक्स पाहून चाहतेही कमेंटची चौकार आणि षटकार मारत आहेत.
दरम्यान मुंबईत युवराजने अनेक वेळा किमसोबत डेट केले होते. चार वर्षे एकत्र घालवल्यानंतर दोघेही २००७ मध्ये विभक्त झाले.
यानंतर आज अचानक युवराजने आपल्या जुन्या मैत्रीनीच्या व्हिडिओवर केलेली कमेंट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सध्या किम शर्माकडे कोणताही मोठा बॉलिवूड चित्रपट नाही, पण किमच्या वैयक्तिक जिवनावर जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी किम शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये किम टेनिसपटू लिएंडर पेससोबत दिसत होती.
किम आणि लिअँडर गोव्यात रेस्टॉरंटमध्ये दंगा मस्ती करतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
हे ही पाहा :