Kiara  
Latest

Kiara Brother : कियाराच्या भाऊ मिशालचा लग्नात खास परफॉर्मन्स (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेस मोठ्या उत्साहात पार पडले. दोघांनी हे लग्न मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत केले. दोघांनीही लग्नाबद्दलची माहिती फारशी सार्वजनिक केले नव्हते. पण, त्यांचे लग्नातील काही मोजकेच फोटो पाहायला मिळतात. याच दरम्यान आता कियाराचा भाऊ मिशाल आडवाणी ( Kiara Brother) याने लग्नात एक धमाकेदार परफार्म केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कियाराचा भाऊ मिशाल आडवाणी ( Kiara Brother ) याने त्याच्या इन्स्टाग्रामवर कियाराच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची झलक दाखविली. यात मिशालने 'तेरी आँखो से याद आये, मेरी बातों में प्यार ' हे धमाकेदार गाणे म्हटलं आहे. यावेळी खास करून मिशालने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या ब्लॅक कलर शर्टवर जॅकेटमध्ये दिसला. लग्नासाठी सहभागी झालेले इतर मान्यवरांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल 'Teri Aankhon Se Yaad Aya Meri Baaton Mein Pyaar' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ खूपच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ शेअर करताना मिशालने कियारा आणि मेहुणा सिद्धार्थला टॅग केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना कियाराने कॉमेन्ट सेक्शन बॉक्समध्ये हार्ट इमोजी शेअर केले आहेत. यानंतर कियाराची मैत्रीण अनिसा मल्होत्रा ​​जैन हिने 'तुझा कमालचा परफार्मन्स, घायाळ केलंस.' अशी कमेंट दिलीय. तर सोशल मीडियावरील एका चाहत्याने 'सिडकियाराच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप शेअर करा' अशी विनंती केली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न खासगी ठेवण्यात आलं होतं. लग्नादरम्यान कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होणार नाही यांची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. मंगळवारी पार पडलेल्या लग्नानंतर आता एक- एक करून फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यादरम्यान मिशालचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या लग्नाला कुटुंबीयासह करण जोहर, मीरा राजपूत, शाहिद कपूर, अमृतपाल सिंग बिंद्रा, तान्या घावरी आणि जुही चावला यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

हेही वाचा : 

\

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT