पुढारी ऑनलाईन डेस्क : 'KGF'मध्ये सुपरस्टार यशसोबत एका दृश्यात दिसणारे कन्नड अभिनेते कृष्णा जी राव यांचे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. अभिनेते कृष्णा जी राव (Krishna G Rao) बरेच दिवस आजारी होते. वयोमानाशी संबंधित आजारामुळे त्यांना बंगळूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. (Krishna G Rao)
कृष्णाजी राव नुकतेच एके दिवशी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी जात असताना त्यांना चिंताग्रस्त आणि थकल्यासारखे वाटू लागले. विश्रांती न मिळाल्याने त्यांना रात्री उशिरा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये बराच वेळ उपचार सुरू होते. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी त्यांना बंगळूरच्या सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'KGF' च्या चाहत्यांना पहिल्या भागात दाखवण्यात आलेले एका अंध वृद्धाचे पात्र नक्कीच लक्षात असेल, ज्याला खाण कामगारांनी मारले आहे. मग रॉकी त्याला वाचवतो. या अंध वृद्धाची व्यक्तिरेखा कृष्णाजी राव यांनी साकारली होती.
कृष्णा जी राव यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण 'KGF' नंतर त्यांची लोकप्रियता खूप वाढली आणि केजीएफचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर त्यांनी सलग ३० चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी, कुमार दिग्दर्शित नैनो नारायणपूर या विनोदी चित्रपटात ते मुख्य अभिनेता होते. हा चित्रपटही तेलुगूमध्ये बनत आहे.