ranbir kapoor and katrina kaif  
Latest

Katrina Weds Vicky : कॅटरिनाने रणबीर सोबत लग्न का नाही केलं?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल पुढील आठवड्यात लग्न करत आहेत. राजस्थानमधील एका हेरिटेज हॉटेलमध्ये शाही थाटात दोघे लग्न करणार आहेत. (Katrina Weds Vicky) पण कॅटरिना कैफ विकीच्या आधी रणबीर कपूरच्या प्रेमात होती. तब्बल ६ वर्षांच्या प्रेमानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. कॅटरिनाने यासंदर्भात एका मासिकाला मुलाखत देऊन रणबीरवर काही गंभीर असे आरोपही केले होते.(Katrina Weds Vicky)

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यातील रिलेशनशिपची बातमी त्या वेळी पिपल या जगप्रसिद्ध मासिकाच्या भारतीय आवृत्तीत प्रसिद्ध झाली होती. पिपल हे मासिक तेव्हा नुकतेच भारतातूनही प्रकाशित होते होते.

कॅटरिना आणि रणबीर युरोपमधील एका बीचवर छान एन्जॉय करतानाचे फोटो प्रचंड गाजले होते. यात कॅटरिना बिकिनीत तर रणबीर कपूर शॉर्टसमध्ये दिसत होता. अजब प्रेम की गजब कहानीपासून दोघे जवळ आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कॅटरिना आणि रणबीर यांनी मुंबईत एकत्र राहण्यासाठी एक फ्लॅटही भाड्याने घेतला होता. फ्लॅटचे इंटिरिअर, भाडे, डिपॉजिट यावर दोघांनी बराच खर्च केला होता.

कॅटरीना आणि रणबीर कपूर बीचवर

पण काही वर्षांनी दोघांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोन कारणं दिली जातात एक म्हणजे रणबीरची आई नीतू सिंग यांना दोघांतील रिलेशनशिप आवडले नव्हते. रणबीरने घरच्यांना सोडून कॅटरिनासोबत राहणं त्यांना बिलकूल पसंत नव्हतं. रणबीरच्या घरी खिसमस पार्टीला कॅटरिना आली होती, म्हणून नीतू या पार्टीलाही हजर नव्हत्या.

रणबीर लग्नाला तयार नव्हता?

कॅटरिनाला रणबीरसोबत लग्न करायचे होते, पण असं सांगितलं जातं की कॅटरिना जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा रणबीर टोलवाटोलवी करत असे. त्यातून दोघांत मतभेद होते गेले. कॅटरिनाने यासंदर्भात थेट काही म्हटलं नसलं तरी GQ या मासिकासाठी तिने एक मुलाखत दिली होती. त्यात ती म्हणते, "पुरुष आणि स्त्री यांच्यात फरक आहे. स्त्री बाळाला जन्म देते पुरुष नाही.

पुरुषांच्या आणि महिलांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा वेगळ्या असतात. पुरुष हे शिकारी प्रवृत्तीचे असतात. पुरुष हे पुरुष असतात म्हणून बऱ्याच समस्या सुरू होतात. ज्यांची मूळ प्रवृत्ती फसवण्याची आहे ते फसवणूकच करणार." तिने यात रणबीरचं नाव जरी घेतलं नसलं तरी तिचा रोख रणबीरकडेच असल्याचं त्या वेळी बोलले गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT